Pune Crime News : पुण्यात तिहेरी हत्याकांड! आईसह 2 लहान मुलांचे अर्धवट जळालेले 3 मृतदेह सापडले
Pune Crime News : हीट अँड रन, कोयता गँग, नंतर पुण्यातील गंभी घटना घडतच आहेत. पुणे जिल्ह्यातील रांजणगावात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका महिलेसह तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. पुणे-अहिल्यानगर मार्गावरील रांजणगावजवळील खंडाळे गावात ही घटना उघडकीस आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, अद्याप या मृतांची ओळख पटलेली नाही. काल महिला आणि दोन मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. त्यांची आधी हत्या करुन मृतदेह जाळले असावेत असा कयास प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील मृत महिला पंचवीस ते तीशीतील आहे तर एका मुलाचे वय अवघे तीन तर दुसऱ्याचे केवळ चार वर्ष एवढे आहे.

कुठे उघडकीस आला प्रकार?
पुण्यातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर रांजणगावजवळ खंडाळे गाव आहे. तिथे हा प्रकार उघडकीस आला आहे. महामार्गावरुन जवळपास दोनशे ती अडीचशे मीटर अंतरावर गावाच्या परिसरात मोकळ्या मैदानात तिघांचे मृतदेह अर्धवट अवस्थेत दिसून आले. हा प्रकार रविवारी उघडकीस आला. यादरम्यान ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरु केला,
महिलेच्या डोक्यात मारहाणीच्या खुना
प्राप्त माहितीनुसार, महिलेच्या डोक्यात मारहाणीच्या खुना दिसत आहे, आधी महिलेला मारहाण करुन तिचा खुन करण्यात आला असावा तसेच त्यानंतर लहान दोन चिमुकल्यांसह तिघांचा पेट्रोल टाकुन पेटवले असावे असा पोलिसांना संशय आहे, दरम्यान पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
परिसरात खळबळ
मृत महिला अंदाजे 25 ते 30 वर्षांची असून या तिघांचा घातपात झाला की, ही दुर्घटना आहे याचा तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, मृतांची उत्तरीय तपासणी प्रक्रियेबद्दल आणि अहवालाबद्दल अद्याप फारसा तपशील हाती आलेला नाही, मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, फाॅरेन्सिक पथकही या घटनेच्या अनुशंगाने तपास करत असून पोलिस मारेकऱ्यांच्या शोधात आहेत.












Click it and Unblock the Notifications