धक्कादायक! मुलीच्या नावे फेक अकाऊंट बनवले महिनाभर चॅटींग अन् भेटायला बोलावून कोयत्याने वार!
Pune Crime News : पुण्यात काल परवाच माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घुण खून झाल्यानंतर खळबळ माजली असतानाच आता किरकटवाडी फाट्यावर पुन्हा एका तरुणाला बेदम मारहाण करुन कोयत्याने भररस्त्यात वार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढत असून सामान्य पुणेकर सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नही यानिमित्त उभा ठाकला आहे.

काय घडला प्रकार?
एका तरुणाने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवले होते. त्यानंतर त्या अकाऊंटवरुन एका व्यक्तीला सुमारे महिनाभर चॅटींग केली होती. यानंतर तरुणाने आपल्यासोबत चॅटींग करणाऱ्या व्यक्तीला आज सकाळी भेटायला बोलावले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. किरकटवाडी फाट्यावर हा प्रकार घडला असून यानंतर कोयता हल्ल्यामागील संशयित दोन आरोपींना पुणे शहर पोलीसांच्या दरोडाविरोधी पथकाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना...एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार
— Archana More-Patil (@Archana_Scoope) September 4, 2024
कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत.. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सिसीटीव्ही फुटेज..@AjitPawarSpeaks @PuneCityPolice @CPPuneCity pic.twitter.com/yYy6gh1ATI
(ही बातमी अपडेट होत आहे..)
दुसरी बाब अशीही सांगण्यात येत आहे की, मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात काही लोकांमध्ये भांडण झाले होते. त्यादरम्यान एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्यांमध्ये सागर नामक तरुणाचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, सागरवर आज हा हल्ला झाला आहे. सागरवर झालेला हल्ला याच घटनेचा बदला आहे.
सुडापोटी पेटलेल्या व्यक्तीने आज सागरला जीवे मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याने जात असलेल्या दुसऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करताना दिसत आहे. तो त्याच्यावर एकापाठोपाठ एक अनेक वेळा हल्ला करतो. दरम्यान, दुसरा तरुण तेथे येतो आणि त्याला कशाने तरी मारहाण करू लागतो.
काही वेळातच सागर बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. मात्र आरोपीने त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला होता. तो निपचित पडल्यानंतरच हल्लेखोर थांबले. तोपर्यंत तो त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला करत राहिला. सागरच्या शरीराची हालचाल थांबते तेव्हाच हल्लेखोर थांबतो आणि तेथून पळून जातो. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी रस्त्यावरून अनेक लोक जात होते, मात्र सागरला मदत करण्यासाठी कोणीही थांबले नाही.












Click it and Unblock the Notifications