Pune Crime:बाप म्हणावं की हैवान! पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने पोटच्या मुलाचाच गळा कापला
Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर परिसरात खळबळ एकच खळबळ उडाली.

आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय 30) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरा मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे.
नेमका कसा घडला थरार!
गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वरूपा या घरी असताना माधव हा राहत्या घरातून मुलगी ही शाळेतून येणार असल्यामुळे तिला घेऊन येतो असे सांगून मुलगा हिम्मतलाही सोबत घेऊन गेला. परंतु, मुलीला बसमधून न घेता बाहेर निघून गेला. त्याने सोबत मुलालाही नेले. त्यानंतर ते परत माघारी आले नाही.
त्यानंतर स्वरूपा यांनी माधवच्या मोबाइलवर फोन केला असता त्याने मी हिम्मतला बाहेर घेऊन सिगारेट पिण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर माधव रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही तसेच मुलालाही आणून सोडलं नाही.
यावेळी त्याचा फोनदेखील बंद होता. तेव्हा स्वरूपा यांनी नोतवाइकांकडे व आजूबाजूस चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोठेच दोघांचा पत्ता लागत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वरुपा यांनी 21 तारखेच्या रात्री साडेबाराच्या सुमारास चंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
चारित्र्यावर सतत संशय अन्...
आरोपी माधव पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताच, चंदननगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असल्याचे सांगितले. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी खाक्या दाखवताच ते पळून गेले.
खुनाला उलगडा कसा झाला
माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, पोलिसांनी त्यास खाक्या दाखवल्या. त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले.
दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं
तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications