संतापजनक, लजास्पद! पंढरपूरला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार! दोन वारकऱ्यांना कोयत्याच्या धाकावर लुटले!
Pune Crime News : महाराष्ट्रात एक अत्यंत निर्दयी आणि लजास्पद घटना घडली आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. एवढेच नाहीतर काही वारकऱ्यांना अडवून लुटल्याचा प्रकारही समोर आला आहे.
राज्यात सद्या वारकऱ्यांची पावले लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पुढे पुढे सरकत आहेत, अशातच वारीत जाणाऱ्या एका मुलीसोबत गैरकृत्य घडल्याने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, पंढरपूरकडे जाणारे दोन वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यावेळी दोन जण दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले.धाकदडपशाही करुन त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला, यानंतर संशयित लुटारुंनी दोन वारकऱ्यांना लुबाडले. यानंतर ते पुढे निघाले.
मुलीवर अत्याचार
एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी एका अल्पवयीन मुलीला गाठले. या मुलीला त्यांनी काही अंतर दुर नेत एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने संताप व्यक्त होत असून दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रीया सुरु आहे.दरम्यान संशयितांची माहिती पोलिस घेत आहेत.
वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
वारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरकडे जातात, लूट आणि गैरकृत्याच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उभा राहीला आहे. वारकऱ्यांच्या काय वस्तू आणि पैसे लुबाडले याचा तपशिल तूर्त मिळू शकलेला नाही.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना एसटीकडून तिकीटात १५ टक्के सवलत
राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केले तर त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या १ जुलैपासून ही योजना लागू होत आहे. जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications