Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात चाकूचा धाक दाखवून 19 वर्षीय मुलीवर गँगरेप!

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील एका बसमध्ये महिलेवर झालेले अत्याचार प्रकरण गाजत असतानाच आता पुण्यातील शिरुर भागात पुन्हा एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे पोलिसांनी असा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

Pune Crime News

प्राप्त माहितीनुसार, सामुहिक अत्याचाराची घटना 1 मार्च 2025 रोजी शिरुर तालुक्यातील एका गावात घडल्याचे समोर आले आहे. लोकसत्ताने या घटनेसंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, सामुहिक अत्याचार प्रकरणात संशयित आरोपीपैकी अमोल पोटे (रा. श्रीगोंदा) आणि किशोर काळे अशी दोघांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, 19 वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील असून शिरुरमध्ये ती आली होती. त्यावेळी तिच्यावर अमोल आणि किशोरची नजर पडली. त्यांनी तिला चाकूचा धाक दाखवला आणि अडवलं. त्यानंतर एका ठिकाणी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.

नातलगासोबत आक्षेपार्ह फोटो काढायला भाग पाडले

संशयित आरोपींनी पीडित तरुणी आणि तिच्यासोबत जो नातलग होता, त्याच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढायला भाग पाडले. दरम्यान नातलगाला ठार मारु असे म्हणत मुलीला सदर प्रकरणी गप्प राहण्याची धमकी संशयितांनी दिल्याचेही समोर आले आहे.

कोण आहेत संशयित आरोपी?

सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीपैकी किशोर काळे हा चालक असून अमोल हा मजुरीकाम करतो. संशयित दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

स्वारगेटमधील अत्याचाराची घटना अजूनही लोक विसरलेले नाहीत. राज्यभरात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. अशातच, पुणे शहरातच आणखी एका घटनेने शहर हादरलं आहे. पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे.

स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.

नांदेड सिटी पोलिस ठाण्यात बापाविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 45 वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+