Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Crime News:धक्कादायक, पुण्यात किळसवाणा प्रकार! भरधाव कॅबमध्ये महिलेसमोर चालकाने केलं 'हे' कृत्य

Pune Crime News Driver masturbates in front of engineer girl : पुणे हे संस्कृतीचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे असे म्हटले जाते, पण या पुण्यात आता धक्कादायक प्रकार घडत आहेत. आधीच गुंडगिरी आणि खुनसत्रांनी पुण्याची चर्चा होत असतानाच महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. चालत्या कॅबमध्ये प्रवासी तरुणीसमोर चालकाने गंभीर प्रकार केला, विशेष म्हणजे हा तरुण 20 वर्षांचा तर इंजिनियर तरुणी 41 वर्षांची आहे.

कॅबमध्ये किळसवाणा प्रकार करतानाची घटना पुण्यातील कल्याणीनगर भागात घडल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

Pune Crime News

नेमका काय प्रकार घडला?

21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कल्याणीनगर येथील एका कंपनीतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कार आली. त्यावेळी एक 20 वर्षाचा तरुण गाडी चालवत होता. काही अंतरावर गेल्यावर बॅक ड्राईव्हरने तरुणीकडे रियर व्ह्यू मिररमधून पाहत हस्तमैथून करायला सुरुवात केली. त्यामुळे तरुणी घाबरली होती. तरुणीने महामार्गावर गाडी थांबवली अन् थेट पोलिस स्टेशन गाठलं.

भर कॅबमध्ये किळसवाणा प्रकार होत असल्याचे पाहुन महिला संतापली आणि तिने गाडी थांबवायला सांगितली. यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. दरम्यान या घटनेनंतर खडकी पोलिसांनी घटनेची माहिती घेत गांभिर्य ओळखून गुन्हाही नोंदवला. त्यानंतर संशयित कॅबचालकाला खडकी पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

कोण आहे कॅबचालक?

प्राप्त माहितीनुसार, 20 वर्षीय कॅब चालकाला अटक करण्यात आली असून याबाबतची माहिती खडकी पोलिसांनी दिल्याचे वृत्त न्यूज 18 LOKMAT ने दिले आहे. कॅबचालकाचे नाव सुमित कुमार असून त्याला अटक केली आहे. तो मुळ उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे, काही काळापुर्वी तो मुंबईहून पिंपरी चिंचवडला स्थलांतरित झाला, असेही पोलिसांनी सांगितले.

चालकाने असे केले कृत्य

पुणे शहरातील हायप्रोफाईल असलेल्या कल्याणीनगर येथे एका कंपनीतील ऑफिसमध्ये तरुणी काम करते. या ठिकाणाहून पिंपळे सौदागर येथे घरी परतण्यासाठी तरुणीने कॅब बुक केली. दरम्यान, तरुणी कॅबमध्ये बसून कार प्रवास करत होती, अशावेळी संशयित कॅब चालकाने कॅब संगमवाडी भागात आणली, त्यावेळी ड्रायव्हर रीअर-व्ह्यू मिररचा वापर करत हस्तमैथून करत होता आणि आरशाचा त्यासाठी त्याने वापर केल्याचे समोर आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+