Pune Crime :पुण्यात हुंड्यासाठी विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न; गळा दाबला, आरडाओरडं अन् 6 जणांवर गुन्हा
Pune News : पुण्यात आणखी एक महिलेचा हुंड्यासाठी खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. सासरच्या मंडळींनी 50 लाखांची मदत दिली तरी विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. तिला गॅलरीतून ढकलून देत खूनाचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी वडगाव शेरीतल्या सिलिकॉन बे सोसायटीतील 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या सहा जणांवर गुन्हा दाखल!
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेनं पोलिसात तक्रार दिली असून आरोपी फरार झाले आहेत. पती प्रणील निकुडे, सासरे उधय निकुडे, सासू वैशाली निकुडे, दीर प्रतीक निकुडे, चुलत सासरे माणिक निकुडे, चुलत दीर प्रमोद निकुडे यांच्याविरोधात विवाहितेनं तक्रार दाखल केलीय. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
50 लाख दिले तरी देखील सासरच्या लोकांकडून छळ!
24 वर्षीय तरुणीचा एप्रिल 2023 मध्ये विवाह झाला. त्यावेळी वडिलांनी 25 लाखांचा खर्च केला. रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तूही दिल्या.
पण लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्या मंडळींनी तरुणीचा छळ करायला सुरूवात केली. वडिलांनी नातेवाईकांकडून पैसे घेत लेकीच्या सासरच्यांना जवळपास 50 लाखांची मदत केली. तरीही तिचा छळ सुरूच होता.

गॅलरीत ओढत नेल अन् खाली फेकण्याचा प्रयत्न!
पतीने 27 मे रोजी तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. तर 25 जूनला मोमोजच्या ऑर्डरवरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा पतीनं तिचं डोकं कपाटावर आपटलं आणि केसही ओढले. तिचा फोन फोडून गॅलरीत ओढत नेलं आणि ढकलण्याचा प्रयत्न केला.
आरडाओरड झाली अन् वॉचमन धावला!
पतीकडून मारहाणीवेळी विवाहितेनं आरडाओरडा केला. त्यामुळे सोसायटीतील वॉचमन आणि काही रहिवाशांनी आवाज दिल्यानं तिचे प्राण वाचले. वॉचमनने महिलेच्या वडिलांना बोलावलं. तिचे वडील मध्यरात्री येऊन तिला घेऊन गेले. तर निकड़े कटंब या घटनेनंतर फरार झाले आहे.












Click it and Unblock the Notifications