Pune Crime : पुणे हादरलं, कुरिअर बॉय असल्याचे सांगून घरात घुसला अन् तरुणीला बेशुद्ध करत अत्याचार..
Pune Crime News : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. आपण कुरिअर बॉय असल्याचे सांगून सदर आरोपी घुसला अन् त्याने एका तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिला घरात बेशुद्ध करत तिच्यावर अत्याचार केला अन् तिच्यासोबत सेल्फी देखील घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोंढव्यातील उच्चभ्रू कॉलनीतील घटना!
25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुणे शहरातील कोंढवा भागात घडली. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी (ता.2) रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेबाबत पोलीस उपायुक्तांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 10 टीम लावल्या!
पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला.
पिडीतेच्या दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला "कुरिअर आहे" असे सांगितले. महिलेने "हे कुरिअर माझे नाही" असं सांगत नकार दिला. मात्र आरोपीने "सही करावी लागेल" असा आग्रह धरला. त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याचवेळी आरोपीने तरूणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
उच्चभ्रू सोसायटी घटना घडली, सुरक्षेचा प्रश्न उपस्थित!
ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्न उपस्थित आले आहेत. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे भान ठेवत गेट पार केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications