Pune Crime: पतीसोबत खटके, रिक्षाचालकाशी प्रेम!'लिव्ह इन'मधील प्रेयसीचा खून मृतदेह रिक्षात ठेवून पसार
Pune Crime : पुणे- पतीसोबत संसारात खटके उडत असल्याने नंतर रिक्षाचालकासोबत प्रेम जुळलं त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रेयसी डोईजड झाली अन् तिचा खून करत तिच्याच आईच्या घराजवळील रिक्षात मृतदेह टाकून रिक्षाचालक असलेला प्रियकर पसार झाला. ही दुर्दैवी घटना ऐन गौरी गणपतीच्या उत्सव काळात घडली.
पुण्यातील पिंपरी चिंडवडमधील हा प्रकार असून या घटनेने खळबळ उडाली आहे. रिक्षाचालक प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली. त्यानंतर आज सकाळी ती उघडकीस आली आहे.

रिक्षाचालकाशी जुळले प्रेम..
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवानी सोमनाथ सुपेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विनायक आवळे असे या खुन प्रकरणातील संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. विवाहानंतर शिवानी सुपेकर हिचे पती सोबत खटके उडत होते. त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीला सोडून दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या महिलेच्या नशिबी मृत्यू आला असून हा दुर्दैवी प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.
पतीसोबत खटके
पतीसोबतचा संसार सुरु झाल्यानंतर त्या दोघांत खटके उडत होते. त्यानंतर शिवानी पतीपासून वेगळी झाली आणि एका रिक्षाचालकासोबत तिचे सुत जुळले. त्यानंतर ते दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहीले.
त्या रात्री वाद अन् केला खून
मंगळवारी रात्री शिवानी आणि विनायक यांच्यात कशावरुन तरी किरकोळ वाद झाला. त्यानंतर विनायकचा राग इतका वाढला की, त्याने शिवानीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला.
चक्क मृतदेह रिक्षात आढळला..
प्राप्त माहितीनुसार, विनायकने जेव्हा रिक्षात शिवानीचा मृतदेह ठेवला त्यानंतर आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं काही जणांना दुरुन दिसत होतं. काही लोक जवळ आले तेव्हा ती मृत असल्याचं त्यांना लक्षात आलं. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान शोध पथकांकरवी संशयिताचा शोध सुरु असतानाच शिवानी आणि विनायक हे एकत्र राहत असल्याचे आणि विनायक बेपत्ता असल्याचे दिसून आले त्यानंतर विनायकवर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर शिवानीचा खून तिचाच प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले.
तीन दिवसांत दोन खून
शिवानीच्या खुनाआधी दोन दिवसांपूर्वी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच अली अन्सारी या व्यकतीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. ऐन गौरी गणपती सणाच्या काळातच दोन खून झाले असून पुण्यातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसल्याचं या घटनांवरुन दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications