पुण्यातील भोंदू बाबा प्रसाद तामदारचे भयंकर कारनामे; भक्तांना वेश्यासोबत संबंधाचा सल्ला अन् कांड!
Pune Crime, What is the Prasad Tamdar case : पुण्यातील 29 वर्षीय भोंदू बाबाचा कारनामा समोर आला आहे. आपल्याला दिव्यशक्ती मिळाल्याचे भासवून तो लोकांना फसवू लागला. तर अनेक लोकांना त्याने त्याच्या जाळ्यात अडकून त्यांचे लैंगिक छळ करत असल्याचे देखील समोर आले. या भोंदू बाबाचा फर्दाफाश झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चला तर जाणून घ्या, पुण्यातील प्रसाद तामदारचे प्रकरण काय आहे?, त्याने नेमके कोणकोणते कारनामे केले आहेत.
हिडन अॅपच्या माध्यमातून भक्तांवर ठेवायचा नजर!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील हिडन ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवून मोबाईल कॅमेरातून त्यांचे खाजगी क्षण पाहणारा 29 वर्षीय भोंदू बाबा प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (prasad taamdar) असे आरोपीचे नाव आहे. त्यास वावधन पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे. सदर तामदार विरोधात एका 39 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचं भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले.
एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या प्रसाद तामदारने अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मृत्यूचा भीती अन् वेश्यागमन करण्याचा सल्ला!
सदर भोंदू बाबा प्रसाद तामदार हा त्याच्याकडे आलेल्या लोकांना त्याच्या राहणीमान आणि स्टाईलने गुरफटून टाकायचा. काही लोकांना तो तुमचा मृत्यू अटळ आहे, असं सांगून त्यावर अजब उपाय सांगायचा. प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा, असा सल्ला त्याने अनेक भक्तांना दिला.
विशेष म्हणजे, शरीरसंबंध सुरू असताना या भोंदू बाबाने मोबाइल दिशादर्शक सुरू करून तो मोबाइल एखाद्या विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगितला. त्याद्वारे मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा भोंदू बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत होता आणि त्यातून आनंद लुटायचा.
मोबाईल बंद पडू लागल्याने आले उघडकीस..!
दरम्यान, एका भक्ताचा मोबाइल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो चेकिंगसाठी आपल्या टेक्निकल असलेल्या मित्राकडे दिला. तेव्हा या मोबाइलमध्ये हिडन ॲप सापडले. यानंतर भोंदू बाबांचा भांडाफोड झाला अन् अखेर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अनेकांनी प्रसाद तामदार विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
डिलिट डेटा परत मिळवण्यासाठी तपास सुरू!
सायबरतज्ज्ञांच्या मदतीने या भोंदू बाबाच्या मोबाइल आणि ॲपची तपासणी करण्यात आली आहे. त्यात भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळून आले आहे. पोलिसांनी भोंदू बाबाकडील तीन स्मार्ट फोन आणि एक टॅब जप्त केला आहे. यातील एक फोन जुना असून, सध्या दोनच फोन तो वापरत असल्याचे समोर आले आहे.
माहितीचे तांत्रिक विश्लेषण करणे आणि त्यातील डिलिट डेटा परत मिळवण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. त्यासाठी फोन आणि टॅब फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल, 2 आयपॅड, सोलोपोशे 0.5 एमडीच्या गोळ्याचं मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉलच्या 9 गोळ्या, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्ह हे साहित्य जप्त केलं आहे.
भोंदू बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेणार आहेत.












Click it and Unblock the Notifications