हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’: पुणे जिल्ह्यातील कलाकेंद्रात 'या' आमदाराच्या भावाचा गोळीबार, तरुणी जखमी..
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क एका कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गोळीबाराचा गंभीर प्रकार
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आहेत. नुकताच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती.
आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा गंभीर आरोप केल्याने सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. दौंडमधील एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करून धिंगाणा घातला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप
रोहित पवार यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी, पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे." ही बाब अत्यंत चिंताजनक असून, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 23, 2025
रोहित पवार म्हणाले- दोषींवर कारवाई होणार की नाही?"
रोहित पवार यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी विचारले आहे, "दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला 'सत्तेचा तमाशा'?" त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, कायदा आणि सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कोणत्या आमदाराचा भाऊ, लावले जाताहेत तर्कवितर्क?
रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे, पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटेंवरही चढवला हल्ला
उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी अन्य एका ट्विटद्वारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. CID, CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषिमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही.
त्यामुळे बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी, पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी.












Click it and Unblock the Notifications