सावरकरांच्या बदनामी प्रकरणी मोठी अपडेट; राहुल गांधी यांना पुणे कोर्टाकडून 'असा' मिळाला दिलासा
काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्यातील न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत पुण्यातील विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडीओ काँन्फरन्सिंगव्दारे हजर राहिले होते. अखेर त्यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.

नेमका काय होता गुन्हा?
मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये केलेल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली अशी तक्रार सावकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली होती होती. पुणे सत्र न्यायालयात त्यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधीनी उपस्थित रहावे यासाठी वारंवार समन्स बजावले होते.
न्यायालयात काय झाले?
वारंवार समन्स बजावल्यानंतर अखेर काल १० जानेवारीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी जामीनदार म्हणून न्यायालयात हजर झाले. राहुल गांधी व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांच्याकडून मिलिंद पवार यांनी कोर्टात बाजू मांडली. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे.
नेहमी होतो वाद
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर कायम वाद होतो. राहुल गांधी सावकरांना माफीवीर संबोधतात. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरुन भाजपनेही अनेकदा आंदोलने केली आहेत. अनेक सभांमध्ये तसेच भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी सावकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आरएसएसवर टिका केल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयातही खटला सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications