Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आरोपी गाडे उसाच्या शेतात लपला? पोलिसांकडून स्निफर डॉग, ड्रोनद्वारे शोधमोहिम, सूत्रांची माहिती

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी काही तासांत आरोपीची ओळख पटविली मात्र तो आरोपी अद्याप हाती लागलेला नाही. हा आरोपी पुण्याजवळीच एका उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिस आता या उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेत आहेत.

Swargate Rape Case

आरोपी तत्काळ झाला पसार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने अत्याचार केल्यानंतर तो पुण्यातच होता. मात्र ही घटना पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. त्यानंतर पुण्यापासून जवळ असलेल्या गावांतून शहरात येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाडीतून आरोपी पसार झाला. तो त्याच्या गावी गेला. तेथे त्याने कपडे व बूट बदलले. पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध सुरु केला.

आरोपी लपला उसाच्या शेतात

सूत्रांनी सांगितले की, आरोपी हा पुण्याच्या आसपास असलेल्या उसाच्या शेतातच लपून बसला असावा. पोलिसही त्या दृष्टीने तपास करत आहेत. पुण्याच्या आसपास उसाचा परिसर मोठा आहे. तेथे पोलिसांकडून शोध मोहिम सुरु आहे. पोलिसांनी स्निफर डॉग आणि ड्रोन तैनात केले आहेत. काही ठिकाणी उस थेट दहा फुटांपर्यंत मोठा असल्याने पोलिसांना ड्रोन कॅमेऱ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांची १३ पथके तैनात

पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी १३ विशेष पथके स्थापन केली आहेत. गुन्हे शाखेच्या आठ पथकांचा त्यात समावेश आहे. गाडे याच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि ओळखीच्या सहकाऱ्यांची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. ३६ वर्षीयआरोपी गाडे पोलिस रेकाँर्डवरचा आरोपी आहे. त्याने यापूर्वी पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि साखळी चोरीचे किमान सहा गुन्हे केले आहेत. तो २०१९ पासून जामिनावर बाहेर आला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+