Pune Bopdev Ghat gang rape : बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाख मिळणार
Pune Bopdev Ghat gang rape : एकीकडे बदलापुरची घटना ताजी असतानाच पु्ण्यातील बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ निर्माण झाली. आता संशयित आरोपींचा शोध सुरु असून आरोपींची माहिती देणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
यासंदर्भात पोलिसांनी घोषणा केली असून पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुण्यातील सर्व टेकड्यावर लाईट बसवण्यात येणार आहेत.

आरोपींची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवणार
राज्यात निवडणुकींचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत बदलापूर प्रकरण गाजले होते. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय मुद्दा होऊ नये. यासाठी सरकारही खबरदारी घेत आहे. त्यातच आता राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यांचे नाव आणि ठावठिकाणा गुप्त ठेवण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
काय घडला होता प्रकार
पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री अकराच्या वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत फिरायला गेली. यावेळी तिघांनी या दोघांवर हल्ला केला होता. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. तरुणाला मारहाण करुन त्याला शर्टने आरोपींनी तरुणाचे हात बांधले, त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. यानंतर आरोपींनी 21 वर्षीय मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी शस्त्राचा धाक दाखवून तिच्या मित्राला ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.
दोनशे संशयितांची कसून चौकशी
प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी परराज्यातून पुण्यात शिक्षणासाठी आली होती ती पुण्यातच राहत होती.दरम्यान सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु असून आतापर्यंत 200 हून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपींची रेखाचित्रही जारी केली आहेत. याआधारे पोलिसांकडून आरोपींना शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांना तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांचा ठावठिकाणा मिळालेला नाही. त्यामुळेच आता या प्रकरणी पोलिसांनी दहा लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.
सर्व टेकड्यांवर लाईट बसवणार
या घटनेनंतर पुण्यातील पोलीस आणि स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर बसवण्यात येणाऱ्या सर्च लाईट आणि आपतकालीन परिस्थितीत वापरण्यासाठी सायरन बसवण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications