Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता पोलीसही सुरक्षित नाही? भाजप नेत्याकडून महिला पोलीस इन्स्पेक्टरचा विनयभंग; याआधीही असचं कृत्य...

पुण्यातील राजकारणात सध्या खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने गंभीर स्वरूपाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार वाड्याजवळील एका राजकीय कार्यक्रमादरम्यान घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Pramod Kondhare case


घटनेच्या दिवशी भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमले होते. या वेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेली एक महिला पोलीस निरीक्षक घटनास्थळी होती. कार्यक्रमानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने काही कार्यकर्त्यांसह आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह जवळच्याच एका दुकानात चहा पिण्यासाठी गेले. त्या गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे यांनी संबंधित महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा अश्लील स्वरूपाचा स्पर्श केल्याचा आरोप आहे.

घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शनिवारी वाड्याजवळील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मागवून तपास सुरू करण्यात आला. तपासानंतर प्रमोद कोंढरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोंढरे यांचा दावा, आरोप खोटे, चुकीचा गैरसमज

या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना प्रमोद कोंढरे यांनी एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला असून, हे सर्व गैरसमजातून घडलेलं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हे पहिल्यांदाच नाही. याआधीही कोंढरे यांच्यावर अशाच स्वरूपाचा विनयभंगाचा आरोप झाल्याचंही तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे.

ही घटना सार्वजनिक आणि पोलीस यंत्रणांमध्ये खळबळ उडवणारी असून राजकीय वर्तुळात ती चर्चेचा विषय ठरली आहे. पुढील तपासात नेमकी सत्यता काय आहे, हे उघड होईलच, पण या प्रकरणामुळे भाजपच्या शहर पातळीवर तणाव निर्माण झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+