नशीब बलवत्तर; ‘त्या'च हेलिकॉप्टरमधून करणार होते खा. तटकरे प्रवास, तिघांच्या मृतदेहाच्या चिंधड्या
Pune Bavdhan Helicopter Crash : आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याजवळ पुन्हा एक हेलिकाँप्टर कोसळलं. बावधन बुद्रुक गावाजवळील डोंगराजवळ दाट धुके असल्याने कँप्टनला अंदाज न आल्याने या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांनी आपला जीव गमावला आहे.
ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले. तेथे अजूनही मदतकार्य सुरु आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच हे हेलिकॉप्टर क्रँश झालं. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे याच अपघातग्रस्त विमानाने प्रवास करणार होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

दाट धुक्यामुळे घडला अपघात
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन सकाळी 6.45 वाजता या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. त्यानंतर हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून जात होते. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात दाट धुके पसरले आहे. या धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हा अपघात झाला.
तटकरे करणार होते प्रवास
प्राथमिक माहितीनुसार, हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा अपघात झाला. सुनील तटकरे यांनी कालही (दि.01) याच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तिथलचा कार्यक्रम आटोपल्यानंतर खा. तटकरे याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले.
पुण्यात आल्यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून, अचानक मुंबईला गेले होते. आज पुन्हा याच हेलिकॉप्टरने खा. तटकरे प्रवास करणार होते. खा. तटकरे यांना नेण्यासाठीच हे हेलिकाँप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. तटकरे यांचा रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी तेथे नियोजित दौरा होता. हेच हेलिकॉप्टर तटकरेंना तेथे घेऊन जाणार होते. मात्र मुंबईत पोहोचण्यापूर्वीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications