Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना, अलिशान कारने दुचाकीस्वारला चिरडलं, तरुणाचा मृत्यू

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भरधाव ऑडी कारचालकाने एका तरुणाला जोराची धडक दिली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रौफ अकबर शेख असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार भरधाव वेगात येणा-या ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचुर झाला आहे. मद्यधुंद असलेल्या कारचालकाने अपघातानंतर तरुणाच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला, असं स्थानिकांनी माहिती दिली आहे. अपघातात मृत्यू झालेला रौफ शेख हा फुड डिलीव्हरी बॉय म्हणून काम करायचा, अशी माहिती समोर आली आहे.

pune Hit and Run case

काल रात्री 11.30 च्या सुमारास रफीक शेख हा तरुण फुड डिलिव्हरी करण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या ऑडी कारने त्याला चिरडलं आहे. ऑडी चालकाने रौफ शेखला दोनदा धडक दिली. दुसऱ्या धडकेत रफीक शेख गंभीर जखमी झाला होता. ऑडी चालकाने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करायचे सोडून त्याने तिथून पळ काढला. स्थानिक लोकांनी तातडीने जखमी जखमी तरुणाला रुग्णालायत दाखल केलं. मात्र तेथे उपचारांदरम्यान फुड डिलीव्हरी करणा-या या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला मध्यरात्री हडपसर परिसरातून अटक करण्यात आली आहे. आयुष तयाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो हडपसर येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. आरोपी कार चालकाने मद्यपान करुन गाडी चालवल्याचा पोलिसांना संशय आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+