Pune News : पुण्यातील जेजुरी - मोरगाव मार्गावर कार-पिकअपचा भीषण अपघात; 8 जण ठार, 5 गंभीर
Pune Accident News : पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. जेजुरी-मोरगावदरम्यान कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 8 जण ठार झाले आहेत तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जेजुरी मोरगाव मार्गावर पिकप आणि कारची धडक झालीय यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. जेजुरीच्या दिशेने बारामतीकडे निघालेली एक कार उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जाऊन धडकली आणि यामध्ये पिकअप टेम्पोमधून साहित्य बाहेर काढणारे मजूरांसह कार मधील काही प्रवासी अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये कारमधील चार जणांचा समावेश आहे. तर टेम्पोतील चौघांचा समावेश असल्याची अशी प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, जवळपास आठ लोकांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत,
दरम्यान या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले तसेच नागरिकांचा मोठा जमाव येथे जमला. या अपघातातील जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. जखमींवर संबंधित रुग्णालयात उपचार सुरु आहेत, हा अपघात कसा झाला याची माहिती पोलिस घेत असून तपासही सुरु करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications