पुण्यात प्राध्यापकाच्या मुलीवर गँगरेप; तिच्याच कॉलेजच्या तरुणांचे कृत्य,आ. धंगेकरांचे पत्र अन् खळबळ
Pune Gang Rape : विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून क्राईमच्या घटनांमुळे अधिक चर्चेत आले आहे. धनदांडग्यांच्या मुलांनी तर या शहरात क्राईमच्या बाबतीत कहरच घातला आहे. भरधाव कारने दोन जणांचा जीव घेतलेली घटना घडल्यानंतर आता पुण्यात गॅंगरेपची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक पत्र पोलिसांना दिले असून यात धकाकादायक व खळबळजनक खुलासे त्यांनी केले आहेत. तर पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांनी दोघांना केली अटक
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीवर त्याच महाविद्यालयातील चार युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली, पण कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्राने अनेक धक्कादायक खुलासे याप्रकरणात उघडकीस आले.

मुलांच्या मुतारीत तर कॅन्टीच्या मागे अत्याचार
आमदार रविंद्र धंगेकरांनी पुणे पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, एका नामांकित महाविद्यालयात 12 ते 15 दिवसांपूर्वी 5 मुलांनी एकत्रित येत महाविद्यालयातील प्रशासन इमारतीला लागून असलेल्या मुलांच्या मुतारीमध्ये व उपहार गृहाच्या मागे संबधित मुलींवर वेळोवेळी सामूहिक बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हिडिओ काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व संगनमताने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप
बलात्कार व विडिओ शुटींगच्या घटना महाविद्यालयाच्या समुपदेशकांनी प्रशासनाला माहिती देऊनही त्याबद्दलची कोणतीही दखल ट्रस्टी, प्रभारी प्राचार्य, व उप-प्राचार्य यांनी घेतली नाही. दोन मुलींपैकी एक मुलगी इयत्ता अकरावी वर्गात शिकत आहे. ती विद्यार्थिनी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाची मुलगी आहे असेही समजते. बलात्कार करण्याऱ्या मुलांनी पीडित मुलीचे वडील (प्राध्यापक) यांना सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असेही समजते. त्यांना ते व्हिडिओ सुद्धा पाठविले असे समजते. या संपूर्ण प्रकरणात कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित आरोपीवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
प्राध्यापक वडिलांना प्रशासनाची धमकी
प्राध्यापक वडिलांनी या प्रकरणी तक्ताळ कायदेशीर कारवाई करावी, अशी वारंवार प्रत्यक्ष भेटून या सर्वांना विनंती केली असेही समजते. परंतु या सर्वांनी एकत्रित मिळून पीडित मुलीचे वडील जे प्राध्यापक आहेत. त्यांना दमदाटी व धमकावले. तसेच आपण या घटनेबद्दल कुठेही वाच्यता करून नये तसेच संस्था व महाविद्यालयाच्या नावास आपल्याकडून बाधा आल्यास आपल्यावर संस्था कारवाई करील, असा इशारा देण्यात आलेला आहे.












Click it and Unblock the Notifications