पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज
पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ एक खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना खराब हवामान आणि पावसामुळे ही घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 नावाचे हे हॅलिकॉप्टर आहे. अपघातामधील जखमी पायलट आणि इतर प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॅलिकॉप्टर प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला जात होते.

पौड जवळच असलेल्या घोटावडे या गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Maharashtra | A private helicopter crashed near Paud village in Pune district. The helicopter belongs to a private aviation company. It was going from Mumbai to Hyderabad. Among the 4 people who were in the Helicopter, the captain sustained injuries and is hospitalised. The rest… https://t.co/Z2MkvvXi91 pic.twitter.com/kF5qg7HOV2
— ANI (@ANI) August 24, 2024
घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी एका वृतवाहिनीशी बोलताना सांगितले की, हेलिकॉप्टर काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होतं. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. त्यामध्ये चार जण होते, 2 जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यात मदतीसाठी आले आहे.












Click it and Unblock the Notifications