'या' दिग्गज नेत्याचा खळबळजनक दावा! "19 डिसेंबरला राजकीय भूकंप! मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार?"
Prithviraj chavan prediction marathi : देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरला मोठा राजकीय स्फोट होणार? अमेरिकेतील एका 'स्टिंग ऑपरेशन'मुळे भारतातील सत्ता समीकरणे बदलणार? आणि या सर्व उलथापालथीनंतर 'मराठी माणूस' थेट देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार? असं खळबळजनक भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. या भाकिताने संपूर्ण देशाच्या राजकारणात प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली आहे.
'एप्स्टाईन फाईल्स' आणि अमेरिकेतील एका गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनचे संदर्भ देत, चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय घटनांचा थेट भारतीय राजकारणावर होणारा परिणाम स्पष्ट केला आहे. १९ डिसेंबरला नेमके काय घडणार? आणि या दाव्यामागील रहस्य काय आहे? वाचा हा सविस्तर रिपोर्ट...

आंतरराष्ट्रीय स्टिंग ऑपरेशनचा संदर्भ
चव्हाण यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना अमेरिकेत घडणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ दिला. त्यांनी याबाबत दावाही केला आहे. अमेरिकेतील 'गुप्तहेर' आणि स्टिंग ऑपरेशन: अमेरिकेत एका व्यक्तीने (जो इस्रायलचा गुप्तहेर होता) अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे.
१९ डिसेंबरची डेडलाईन
अमेरिकन सरकार एक नवीन कायदा करून, १९ डिसेंबरला या 'दिग्गजांची' नावे सार्वजनिक करणार आहे. अमेरिकेतील या खुलाशांमुळे जगात मोठा राजकीय धुमाकूळ माजण्याची शक्यता आहे आणि त्याचे पडसाद भारताच्या राजकारणावरही उमटणार आहेत.
एप्स्टाईन फाईल्सचा उल्लेख
याआधी, त्यांनी 'एप्स्टाईन फाईल्स' (Epstein Files) मुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख केला होता. या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास, त्याचे गंभीर परिणाम भारताच्या राजकारणावरही होतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
'मराठी व्यक्ती' पंतप्रधान होण्याची शक्यता?
पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट १९ डिसेंबर ही तारीख देऊन राजकीय तर्क-वितर्कांना चालना दिली आहे. स्टिंग ऑपरेशनमुळे अमेरिकेतील जे मोठे नेते अडचणीत येणार, त्याचा थेट परिणाम भारतीय सत्ताधाऱ्यांवर कसा होईल, याबद्दल त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी, याच राजकीय उलथापालथीमुळे देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता निर्माण होईल, असे त्यांचे भाकीत आहे.
चव्हाणांचा दावा आणि रहस्य
"या यादीत कोणाकोणाची नावे आहेत, याची मला फारशी कल्पना नाही," असे सांगून चव्हाण यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले. मात्र, एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने एवढ्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हवाला देत थेट देशाच्या सर्वोच्च पदाबद्दल भाकीत करणे, या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या १९ डिसेंबरला अमेरिकेत कोणता गौप्यस्फोट होणार आणि त्याचे भारतीय राजकारणावर कसे परिणाम उमटतात, याकडे देशातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.












Click it and Unblock the Notifications