Modi Maharashtra Visit : काँग्रेसच्या अजेंड्यापासून सावध रहा- PM मोदी, पीएम किसानचा 18 वा हप्ता जारी
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे तर अनेक प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहेत. दरम्यान, पीएम मोदी हे वाशीम जिल्ह्यातील पोहोरादेवी येथे दाखल झाले.

या ठिकाणी त्यांनी पोहरादेवी मातेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली. व त्यांच्या हस्ते बंजारा भवनाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती.
फडणवीसांच्या कामाचे केले कौतुक
मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही योजना सुरु झाली आहे. आज उद्घाटन झालेल्या बंजारा समाज संग्रहालयाला अवश्य भेट द्या, असे आवाहन देखील मोदी यांनी केले.
काँग्रेससह महाविकास आघाडीवर टीका
इंग्रजी हुकुमशांप्रमाणेच काँग्रेसचा परिवार दलित, पिडीतांना आपल्या बरोबरीचे मानत नसल्याचा आरोप मोदींनी केला. त्यामुळे स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही हा समाज अजूनही मागे असल्याचे ते म्हणाले. अशा समाजासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. पोहरादेवी येथील कामावरुन मोदींनी महाविकास आघाडी सरकावर देखील टीका केली. अर्बन नक्षलवादी काँग्रेसला चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन मोदींनी केले.
ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सुत्रधार काँग्रेसचा नेता
दिल्लीत ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सुत्रधार काँग्रेसचा नेता असल्याचा आरोप मोदींनी केला. या पैशांतून काँग्रेस आपल्यात फूट पाडत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आपण सर्वांनी एक राहण्याची आवश्यकता असल्याचे देखील मोदींनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीसह कॉंग्रेसवर मोदींचा हल्लाबोल

कार्यक्रम स्थळाचा व्हिडिओ...!
|| जय सेवालाल ||
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 5, 2024
🕐 दु. १२.४६ वा. | ५-१०-२०२४ 📍पोहरादेवी, वाशिम.
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा@narendramodi#Maharashtra #JaiSevalalModiji #ModiGivesMumbaiMetro https://t.co/YCEq0BnYx1
मोदीजींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

जळणाऱ्यांना जळू द्या, आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात काम करत राहू- सीएम शिंदे

बंजारा समाज प्रामाणिकपणे प्रगती करतोय- मुख्यमंत्री शिंदे

पोहरादेवीला येणारे पहिले पंतप्रधान - फडणवीस
अजित पवार म्हणाले- आज आनंदाचा दिवस















Click it and Unblock the Notifications