मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? मनोज जरांगेना ‘या' भाजप नेत्याचा टोला

मुंबई - मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दीक कलगीतुरा रंगला आहे. त्यांचे एकमेकांवर टीका करणे सुरुच असून आज पुन्हा मनोज जरांगे यांच्या टीकेला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. मी म्हणजे मराठा समाज असे त्यांना वाटते मराठा समजाने सातबारा मनोज जरांगे यांच्या नावावर करुन दिला आहे का? का पावर ऑफ अॅटर्नी करुन दिली आहे? असा हल्लाबोल दरेकर यांनी आज केला.

पाॅवर ऑफ अॅटर्नी करुन दिली आहे?

प्रवीण दरेकर म्हणाले, मी म्हणजे मराठा समाज असे त्यांना वाटते. त्यांना जर कुणी बोलले तर मराठा समाज असे बोलेल तुमच्या एखाद्या भुमिकेवर जर आम्ही विषय मांडला तर मराठा समाजाचा कसा काय अपमान होतो? मराठा समाजाने सातबारा मनोज जरांगेंच्या नावावर करुन दिला आहे का? का पाॅवर ऑफ अॅटर्नी करुन दिली आहे? असा सवालह त्यांनी केला.

Pravin Darekar vs Manoj jaranage bjp vs maratha maharashtra news

याला दुखव, त्याला दुखव..सबुरीने घ्या

दरेकर म्हणाले, सर्व तुमच्या सोबत राहतील पण आज याला दुखव, त्याला दुखव परवा त्याला दुखव असे सुरु आहे. प्रत्येकाचे सामाजिक क्षेत्रात योगदान असते. त्यामुळे थोडे संयमाने आणि सबुरीने त्यांनी घ्यावे असेही प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला.

त्यांच्या आंदोलनाला यश मिळेल पण ज्या गोष्टी सरकार करते त्या गोष्टींना त्यांनी प्रतिसाद द्यावा. आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ, मदत करु परंतु वड्याचे तेल ते वांग्यावर काढत आहेत. माझ्या बँकेचा आणि खात्याचा काही संबंध आहे का? मी तुम्हाला माहिती द्यायला तुम्ही काय अॅथोरिटी आहात का? नाबार्ड, आरबीआय, कोर्ट न्यायालयीन व्यवस्था अॅथोरीटी असते.

प्रवीण दरेकर म्हणाले, आमच्या प्रकरणांना आम्ही उत्तरे दिले व संबंधित यंत्रणांचे त्यात समाधानही झाले. क्लिनचिटही मिळाली. पण त्यांनी मला प्रश्न विचारणे म्हणजे जरा अतीच यातून जरा बाहेर या. प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या कुंडल्या आणि सातबारे असतात.

डोक्यात हवा जाऊ देऊ नका

मनोज जरांगेंनी आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नये. त्यांनी राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांवर लक्ष घालावं. सरकार मराठा समाजासाठी काय करतेय हे, आम्ही कालच्या कार्यक्रमात दाखवले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आहे. त्यामुळे शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. आम्हीही 20 वर्षांपासून राजकारणात आहोत. आम्हीही संघर्ष केला आहे. आम्हालाही उत्तर देता येते. त्यांनी हमरीतुमरीची भाषा टाळावी. असे बोलायला मराठा समाजाने आपला सातबारा त्यांच्या नावे केलाय का? असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?

माझ्याविरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरु करणार. तुम्ही मोठे तज्ज्ञ आहात. तुम्ही क्रांती मोर्चा संपवला. तुम्हीच समन्वयकांवर तुम्हीच आरोप केले. तुम्ही पडद्यामागून होते आणखीन पाच, सहा जण होते तुमच्यासोबत होते. स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मारक तुम्ही आहात हे मला माहित आहेत. दरेकरांनी बँकमध्ये घोटाळा केला. ते मागच्या दाराने आमदार झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+