कोर्टाबाहेर आलेला प्रशांत कोरटकर संतप्त शिवप्रेमींच्या तावडीतून वाचला; कोर्टाने दिला 'हा' निर्णय
इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या व महापुरुषांचा अपमान करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर सेशन कोर्टात दाखल करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित पोलिसांनी तत्काळ प्रशांत कोरटकरला वाहनात घातल्याने अनर्थ टळला.

काय घडले कोर्टात?
प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी त्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली. कोरटकरचे गुन्हे गंभीर आहेत. त्याच्या व्हाईचा सॅम्पल घ्यायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टापुढे सांगितलं. परंतु कोरटकरच्या वकिलांना आशिलाचे कलम पाहता त्याला अटकेचीही गरज नसल्याचे सांगितले. दोन्हीकडचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यावर कोर्टाने कोरटकरला तीन दिवासांची कोठडी सुनावली.
काय म्हणाले असिम सरोदे?
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही कोर्टाकडे सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. प्रशांत कोरटकरने ज्या मोबाईल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल, असं वकीलांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे आरोपीच्या वकीलांनी हे मुद्दे खोडून काढले. पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. ज्या-ज्यावेळी पोलिसांना तपासात आवश्यक असेल, तेव्हा सहकार्य करु, असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
कोर्टात कोण काय म्हणालं?
आरोपीचे वकील
प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती. लावलेल्या कलमानुसार त्याच्या अटकेची गरज नव्हती.
आसिम सरोदे
राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी.
पोलिस
कोरटकरची विधानं गंभीर आहेत. तो महिन्यापासून फरार होता. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे. सात दिवसांची कोठडी मिळावी.












Click it and Unblock the Notifications