Prashant Koratkar च्या रोल्स रॉईसचे गुढ उलगढले; थेट पुणे कनेक्शन, मुळशीच्या बिल्डरचा कसा समावेश?
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस कारचे अखेर पुणे कनेक्शनमुळे गुढ उकलले आहे.
पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर ही गाडी सापडल्याने एकच खबबळ उडाली. यासंदर्भात एका मराठी वृत्तवाहिणीने व्हिडिओ देखील जारी केला आहे.

मुळात प्रशांत कोरटकरची शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यातूनच ही कार बांधकाम व्यावसायिक कलाटे यांनी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राजकीय आश्रयामुळे तो फरार झाल्याची चर्चा होती. जवळपास महिनाभराच्या शोधानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोल्हापूर न्यायालयात काल हजर करण्यात आल्यावर कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.
कार कुठे सापडली?
प्रशांत कोरटकरने जी कार खरेदी केली होती, ती कार घोटाळ्याचे आरोप असलेल्या महेश मोतेवार यांच्या कंपनीच्या नावावर आहे. सीआयडीला देखील ही गाडी सापडत नव्हती. मात्र पिंपरी चिंचवड येथील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसवर ही कार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
वकिलाकडून कोरटकरवर हल्ला
प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलाकडूनच हल्ला करण्याचा प्रयत्न काल झाला. पोलिस बंदोबस्त असतानाही कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. कोरटकरला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तो फरार असताना त्याला मदत करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सध्या कोरटकर पोलिस कोठडीत आहे. कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार होती. सुरक्षेच्या कारणासाठी सकाळी लवकर त्याला न्यायालयात नेण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयातून घेऊन जात असताना अचानक एका वकिलाने त्याच्या दिशेने चप्पल भिरकवण्याचा; तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवले. या घटनेने गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अमितकुमार भोसले असे त्याचे नाव आहे.
प्रशांत कोरटकर इतकी महागडी कार कशी आली?
ठगबाज महेश मोतेवारने चिटफंडच्या माध्यमातून साडे चार लाख लोकांची फसवणूक केली. त्याने 4,700 कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणात पहिला गुन्हा पुण्यात नोंदवण्यात आला. मग धाराशिवमध्ये दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर सीआयडीने तपास हाती घेतला. डिसेंबर 2015 मध्ये मोतेवारला अटक झाली.
तेव्हापासून तो तुरुंगात आहे. मोतेवारला अटक झाल्यानंतर त्याच्या मालकीच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. आता मोतेवारच्या कंपनीच्या नावे नोंद असलेली एवढी महागडी कार कोरटकरकडे सापडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गेल्या 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या मोतेवारची रॉल्स रॉईस कार कोरटकरडे कशी आली?, त्याने ही कार लिलावातून विकत घेतली का?, हा लिलाव नेमका कधी झाला?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे कोरटकर देऊ शकतो. दरम्यान, कोरटकरकडे असलेली कारचे कनेक्शन आता थेट पुणे येथील मुळशी येथे लागले.












Click it and Unblock the Notifications