Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, दुबईला पळून गेला कसा? चर्चा वाढली

कोल्हापूरमधील इतिहास आभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कोरटकर याने सावंतांना फोनवरुन धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकरने कुठे-कुठे प्रवास केला याचीही माहिती घेतली जात आहे.

Indrajit Sawant threat case

नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार आहे. त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असून त्याला पुष्ठी देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विरोधकांकडून उपस्थित प्रश्न

या प्रकारानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. कोरटकरला २५ दिवस होऊनही अटक न झाल्याने खासदार संजय राऊत यांनी नागपूर पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. संशयित आरोपीने देश सोडून जाणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. पोलिसांनीच कोरटकरला पळायला मदत केली असेल, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो, कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

दुबईला पळून गेल्याची चर्चा

प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला होता. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आता तो देश सोडून गेल्याची चर्चा आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे. प्रशांत कोरटकर दुबईला जावो की कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रशांत कोरटकरचा पासपोस्ट जप्त करा अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्जही केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+