प्रशांत कोरटकरला तेलंगाणातून अटक; नेमका काय करत होता? कसा फिरत होता? वाचा संपूर्ण घटनाक्रम
इतिहास आभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगाणातून अटक करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणात पळाला होता. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तेलंगणातून अटक केली.

तीन ठिकाणी गुन्हे दाखल
सावंत यांना धमकी प्रकरणात आरोपी असलेल्या प्रशांत कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल आहेत. त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. तो त्याच्या निवासस्थानी आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशात त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू होता. नागपूर सायबर पोलीस ठाण्याचीदेखील यासाठी मदत घेण्यात आली होती.
कसा फिरत राहिला?
प्रशांत कोरटकर सुरुातीला चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. हे समजल्यावर कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरातछापा घातला. मात्र, काही तासांपूर्वीच त्याला पोलिसांबाबत माहिती मिळाल्याने तो पळून गेला. फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र, अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती. कोरटकर ज्या वाहनातून फिरत होता त्या वाहनाच्या मागावर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक होते. कोरटकरने चंद्रपुरातून एका क्रिकेट बुकीच्या कारने पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्याने दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना तपासात अडचणी आल्या. अखेर कोल्हापूर पोलिसांना दुसऱ्या वाहनाचा देखील शोध लागल्याने तेलंगणा येथे जाऊन कोरटकरला बेड्या ठोकल्या.
सावंतांनी केली होती ही मागणी
कोरटकर हा विदेशात पळून जाण्याची भिती फिर्यादी इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केली होती. त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही केली होती. याच प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ठाम होते. कोरटकर कोठेही गेला तरी पोलिस त्याला शोधून काढतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता. त्यात दरम्यान पत्नीने पोलिसांना स्वतः पासपोर्ट आणून दिल्यावर तो विदेशात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आत तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली.












Click it and Unblock the Notifications