संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकर प्रकरणाने घेतलं धक्कादायक वळण
पुण्यातील एका रेव्ह पार्टी प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आता आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका महिलेसोबत संबंध ठेवताना तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रांजल खेवलकर यांनी तिच्या संमतीशिवाय खासगी क्षणांचे व्हिडिओ काढले आणि त्यांचा गैरवापर केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी खेवलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीच एका रेव्ह पार्टीप्रकरणी खेवलकर यांना अटक करण्यात आली होती.
रुपाली चाकणकर यांचे गंभीर आरोप
यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आढळल्याचा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास महिलांची तस्करी या दृष्टीनेही व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भात महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना पत्रही पाठवले होते. चाकणकर यांच्या या आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले होते. जळगावमध्ये भाजपने खडसे यांच्या विरोधात आंदोलनही केले होते.
आता या नव्या गुन्ह्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications