प्रांजल खेवलकर अडचणीत, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी 28 वेळा रुम बुक केल्याचा आरोप; मोठं वळण....
पुण्यातील एका रेव्ह पार्टीप्रकरणी (Pune Rave Party) अटकेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीडमधील 'सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थे'ने राज्य महिला आयोगाकडे (State Women's Commission) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, खेवलकर यांनी खराडी येथील एका हॉटेलमध्ये तब्बल 28 वेळा रूम बुक केल्याचा दावा करण्यात आला आहे.

मानवी तस्करीचा संशय आणि मोबाईलमधील पुरावे
तक्रारीत, प्रांजल खेवलकर यांनी हॉटेलमध्ये अनेक मुलींना बोलावल्याचा आरोप असून, हा प्रकार मानवी तस्करीचा (Human Trafficking) भाग असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 28 वेळा रूम बुक करणे हे एखाद्या संघटित रॅकेटचा भाग असू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गंभीर आरोपांची चौकशी करण्याची मागणी संस्थेने महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांना (Pune Police) प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स आढळले आहेत. त्यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवून 'ऐसा माल चाहिए' असा मेसेज केला होता. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई असून, त्यांचा विवाह रोहिणी खडसे यांच्याशी झाला आहे. त्यांचा रिअल इस्टेट (Real Estate), इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) आणि जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. याशिवाय, साखर आणि ऊर्जा क्षेत्रातही त्यांच्या कंपन्या आहेत. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय असल्या, तरी प्रांजल खेवलकर राजकारणापासून दूर आहेत. शनिवार, पहाटे खराडी येथील एका पार्टीतून खेवलकर आणि त्यांच्या चार मित्रांना, दोन महिलांसह अटक करण्यात आली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.












Click it and Unblock the Notifications