विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर! प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Prakash Ambedkar Announces Second Candidate List : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोग ही घोषणा करेल. त्यापुर्वीच सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता वंचितनेही कंबर कसली असून त्यांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे.

Prakash Ambedkar Announces Second Candidate List of Vanchit

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी

  1. मलकापूर - शहजाद खान सलीम खान
  2. बाळापूर - खातिब सय्यद नतीकउद्दीन
  3. परभणी - सय्यद सलीम सय्यद साहेबजान
  4. संभाजीनगर मध्य मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
  5. गंगापूर - सय्यद गुलाम नबी सय्यद
  6. कल्याण पश्चिम - अयाझ गुलजार मोहवी
  7. हडपसर - मोहम्मद अफरोज मुल्ला
  8. माढा - इमतियाज जफर नडाफ
  9. शिरुर - अरीफ मोहम्मअली पटेल
  10. सांगली - अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकाही स्वबळावर लढवणार आहेत. त्यामुळे आता त्यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे दुसऱ्या लिस्टमध्ये एकूण दहा नावे आहेत.

आज प्रकाश आंबेडकर यांनी ही यादी जाहीर केली. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर लिस्ट जारी करण्यात आली आहे. वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी उबाठा पक्षाशी युती करण्याचा निर्णय मागच्या वर्षी जाहीर केला होता. त्यानंतर शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र येईल असेही सांगण्यात आले होते दोघांनी संयुक्त माध्यमांशी वार्तालापही केला होता पण नंतर महाविकास आघाडीशी बिनसल्याने वंचितने आपला निर्णय रद्द केला.

वंचितने लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी किती जागांवर विजय मिळवेल हा प्रश्न आहे. कारण खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात लोकसभा निवडणुक लढवली होती तिथे वंचितला पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अकोल्यातील दोन्ही मतदारसंघातून वंचितचे खाते उघडणार का हेही पाहावे लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+