मोठी बातमी: छातीत त्रास होत असल्याने प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयात केले दाखल
Prakash Ambedkar admitted to hospital : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऐन निवडणुकीत आजारी झाले आणि त्यांच्यावर अँजिओप्लाॅस्टी करावी लागली. आता यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत त्रास जाणवत असल्याने आज पहाटे पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओग्राफीसह इतर तपासण्यात करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे. हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तीन ते पाच दिवस रुग्णालयात
प्रकाश आंबेडकर यांच्यावर येत्या तीन ते पाच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील ३-५ दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने एक पोस्ट एक्सवर करण्यात आली आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु असल्याचे म्हटले आहे.
काय आहे पोस्ट?
बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. आंबेडकर कुटुंब यावेळी प्रश्न घेणार नाही आणि आपणास विनंती करतो की कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा कारण ते या परिस्थितीला सामोरे जात आहेत. पुढील ३-५ दिवस बाळासाहेबांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, VBA च्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभाग यांच्या सहकार्याने पुढील काही दिवस VBA च्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. बाळासाहेबांना तुमच्या चिंतनात ठेवा आणि ते लवकर बरे व्हावे ही प्रार्थना.
Balasaheb Ambedkar was admitted to a hospital in Pune in the early hours of Thursday morning, October 31, for a chest pain.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
Balasaheb Ambedkar is being treated at the ICU for a blood clot in his heart. 𝐇𝐢𝐬 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭 𝐜𝐨𝐧𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐢𝐬 𝐬𝐭𝐚𝐛𝐥𝐞 and 𝐡𝐞 𝐰𝐢𝐥𝐥…












Click it and Unblock the Notifications