Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण होणार मंत्री..? कुणाला लागणार लाँटरी..? 'ही' नावे आली चर्चेत

येत्या पाच तारखेला गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांचे काही मंत्रीही यावेळी शपथ घेतील. संभाव्य माहितीनुसार भाजपचे 10 ते 15, शिंदे गटाचे 10 ते 12 आणि अजित पवार गटाचे 08 ते 10 मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

List of BJP Ministers

बावनकुळे यांनी दिली माहिती

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री ट्विट करत या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा होईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहासह भाजपचे केंद्रातील अनेक मंत्री, मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी आमंत्रणे पाठविण्यात आल्याचे समजते. हा सोहळा भव्यदिव्य करण्याचे नियोजन भाजपने केले आहे. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री कोण व मंत्री कोण होणार, या चर्चा मात्र रंगल्या आहेत.

भापजचे 15 मंत्री घेतील शपथ

मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे मुख्यमंत्र्यांसह किमान 15 मंत्री शपथ घेतील. शिंदे गट व अजित पवार गटातील काही संभाव्य नावेही चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे नेते स्वतः अजित पवार हे दोघेही शपथ घेतील, असेही सांगितले जात आहे. अजित पवारांना अर्थखाते देण्यावर संमती झाली असली तरी, गृहखाते भाजपला स्वतःकडे लागत असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे ही नावे आहेत चर्चेत

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथ घेणाऱ्या या मंत्र्यांमध्ये जेष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे या आमदारांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे. मात्र अद्याप या नावांबद्दल अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

एकनाथ शिंदेंची तब्बेत बिघडली

दुसरीकडे या शपथविधी सोहळ्यापूर्वी महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुळ गावी दरे येथे आराम करण्यासाठी गेलेले आहेत. ते तेथे आजारी असल्याचे सांगितले जाते. आज ते पुन्हा मुंबईमध्ये परतणार आहेत. ते मुंबईत परतल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+