ट्रक हेल्पर अपहरण प्रकरण : पुजा खेडकर यांच्या बंगल्याची झडती! पोलिसांच्या हाती लागल्या 'या' वस्तू..!
Pooja khedkar Dilip khedkar bungalow raided : युपीएस्सी प्रकरणानंतर पुजा खेडकर प्रकरण चांगलेच गाजले. यानंतर पुजा खेडकर यांचे पदही गोत्यात आले. दरम्यान आता पुजा खेडकर यांच्याशी संबंधित आणखी एक बाब समोर आली आहे. एका ट्रक हेल्परचे अपहरणाचा धागा पुजा खेडकर कुटुंबाशी जोडला गेला आहे. यादरम्यान पोलिसांनी या अपहृताची सुटका केली असून खेडकर यांच्या बंगल्याची झडतीही घेतली आहे.

फोटो- संग्रहीत
नवी मुंबईत घडलेल्या अपघातानंतर एका ट्रक हेल्परचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणात जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, कारण हे प्रकरण पुजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे ज्याचे अपहरण झाले तो प्रल्हाद कुमार पुण्यातील दिलीप खेडकर यांच्या बंगल्यात आढळला, त्यानंतर दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणाचा आरोप झाला आहे.
नेमके काय प्रकरण आहे?
नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलवर एका मिक्सर ट्रकची आणि एका कारची टक्कर झाली. अपघातानंतर, कारमधील लोकांनी मिक्सर ट्रक चालवणाऱ्या प्रल्हाद कुमार यांचे अपहरण केले. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अपहरणासाठी वापरलेल्या कारच्या नंबर प्लेटवरून (MH 12 RT 5000) ती कार पुण्यातल्या चतुर्श्रृंगी भागातील पूजा खेडकर यांच्या घरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि प्रल्हाद कुमारला सुखरूप बाहेर काढले.
बंगल्यात झाडाझडती
अपहरणाच्या तक्रारीनंतर खेडकर यांच्या बंगल्याची झाडाझडती पुणे पोलिसांनी घेतली. त्यावेळी पुजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना आत जाण्यास मज्जाव केला व पोलिसांच्या सरकारी कामात अढथळा आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. तसेच दावाही करण्यात आला की, पोलिसांना बाहेर काढण्यासाठी पाळीव कुत्र्यांनाही सोडून देण्यात आले. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. दरम्यान मनोरमा खेडकर या त्यांच्या बंगल्यात नंतर दिसून आल्या नाहीत, या घटनेनंतर त्या तिथून निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस त्यांचा ठावठिकाणा शोधत आहेत.
घरात काय काय आढळलं?
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी घेतले तेव्हा लोकेशन बंगल्यात दाखवत होते पण पोलिस जेव्हा बंगल्यात गेले तेव्हा दोघांच्या मोबाईलचे लोकेशन बंगल्यात आढळणे बंद झाल्याचे दिसून आले. दरम्यान , पोलिसांना दोघांचे मोबाईल बंगल्यात सापडले नाही पण बंगल्यातून पुजा खेडकर यांचा जुना मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बंगल्यात ५००० क्रमांकाची लँड क्रुझर नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून उतर गाड्या मात्र बंगल्यातच आहेत.












Click it and Unblock the Notifications