नागपूर हिट अँड प्रकरण: चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा गाडीत होता, आमच्यावर दबाव नाही- पोलिसांचा दावा
Nagpur Hit and Run Update, Chandrasekhar Bawankule : नागपुरात सोमवारी मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची संकेतची गाडी होती. स्वतः बावनकुळेंनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपायुक्तांनी प्रेस घेऊन या प्रकरणाची सविस्तर दिली. तसेच आमच्यावर कोणाचाही दबाब नसल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाले पोलिस उपायुक्त?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात धडक दिलेल्या ऑडी कारमध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनीत चिंतनवार, आणि संकेत बावनकुळे बसले होते. संकेत बावनकुळे देखील त्यावेळी गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रात्री तपास केल्यानंतर कळाले?
पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते. मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली आहे की, संकेत बावनकुळे गाडीत होता. अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन ये आम्ही जेव्हा चौकशी केली. तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहीत पडलं म्हणून काल रात्री त्याला बोलावून त्याची चौकशी केली आहे. हे कुठून आले होते याचा तपास केा असून ते लाहोरी हॉटेलमधून आलेले होते. तिथे बार ही त्या ठिकाणाहून ते जात होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिसांनी सांगितले की, आमच्यावर कोणताही दबाव नाही. सीसीटीव्ही अजिबात डिलिट केलेले नाही. जे कोणी आरोप करत आहे, त्यांचा आरोप खोटा आहे.
जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी
मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आवाहन बावनकुळेंनी केलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.












Click it and Unblock the Notifications