Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बोपदेव घाटात तरुणीवर रेप करणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी केली अटक; वाचा- कसा केला तपास

Bopdev Ghat Rape Case : पुणे शहरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी सुरत येथून आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर 7 दिवसांपूर्वी कोंढवा परिसरातील सासवडच्या दिशेने जाणाऱ्या बोपदेव घाटात रात्री तीघांनी धारदार कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून सदर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेर त्यांना जेरबंद करण्यात आले.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची 30 पथके व इतर 30 पथके अशी एकूण 60 पथके कार्यरत केलेली होती. त्याशिवाय जुने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची देखील मदत घेऊन त्यांना तपास कामात सक्रिय केले. सदर घटना ही अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी घडल्याने घाट परिसरात सदर जागी रात्री अंधार असल्याने आरोपींना पाहणारे प्रत्यक्षदर्शी इतर कोणीही नव्हते. मोबाईल नेटवर्क नसल्याने तांत्रिक तपास पोलिसांना करता आला नाही.

Bopdev Ghat Rape Case

अंधार असल्याने सीसीटीव्हीत काहीच मिळेना

घाट परिसरात सीसीटीव्ही कुठे नसल्याने व जे उपलब्ध सीसीटीव्ही होते त्याची दृश्यमानता स्पष्ट नसल्याने तपासात अडथळे जाणवले. आरोपींनी पिडित तरुणी व तिच्या मित्राचे मोबाईल सुरुवातीला घेऊन जाताना परत त्यांना केले होते. तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावत घटनास्थळावरुन आम्ही गेल्यानंतर 15 मिनिट बाहेर याव्याचे नाही असे बजावल्याने आरोपी नेमक्या कोणत्या दिशेला पळून गेले याचा थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी सुरुवातीला दोन दिवस तांत्रिक तपासावर भर देत सुमारे पाच हजार मोबाईलचा डम डाटा काढून त्याचे विश्लेषण केले.

रेखाचित्र तयार केली, सुगावा लागताच केली अटक

आरोपींची रेखाचित्र तयार करुन त्याद्वारे तपास करत संशयित 450 ते 500 सराईत आरोपींची चौ कशी करण्यात आली. 125 ते 150 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील 20 किलोमीटर भागातील सर्व संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली. जवळपासच्या 45 गावात पोलिस पथके जाऊन त्यांनी सराईत गुन्हेगारांकडे चौकशी केली.अखेर पोलिसांना सुगावा लागताच तिघांना अटक केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+