नीचपणाचा कळस! 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या
कोल्हापूर : बदलापुरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना शहरात घडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावात ही घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेली मुलगी बुधवारी, 21 ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती. त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आज गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी मुलीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असू श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा पोलिस शोध घेत आहेत.

पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
पुणे शहरातील भवानी पेठेतील एका शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीवर 19 वर्षीय तरुणाने 15 ऑगस्ट रोजी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघेही भवानी पेठेतील एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत.
या दोघांची ओळख असून 15 ऑगस्ट रोजी शाळेच्या दुसर्या मजल्यावर पीडित मुलगी बॅग घेण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी मुलगा हा स्वच्छतागृह जवळ लपून बसला होता. त्या ठिकाणी पीडित मुलगी येताच तिचा हात पकडून स्वच्छतागृहामध्ये घेऊन गेला. या प्रकाराने मुलगी घाबरली, तिने आरोपीला धक्का देऊन तेथून पळ काढला.












Click it and Unblock the Notifications