पुणे मनपा निवडणूक : 'या' 15 प्रभागांत प्रतिष्ठा पणाला! दिग्ग्ज माजी नगरसेवक एकमेकांना भिडणार
PMC Election 2026 : पुणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक केवळ सत्तास्थापनेसाठीचीच नाही, तर अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. १५ हून अधिक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि तुल्यबळ उमेदवारांमध्ये थेट 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. विशेषतः प्रभाग ८ मध्ये भाजपचे सनी निम्हण यांच्यासमोर राष्ट्रवादीने मोठे आव्हान उभे केले असून, येथील राजकीय समीकरणे पाहता निम्हण यांच्यासाठी ही लढत यंदा बरीच कठीण मानली जात आहे. प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना दिसत असला, तरी शिवसेना (दोन्ही गट), मनसे आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी चौरंगी लढतींचे चित्र निर्माण केले आहे.

पुण्याचे 'कुरुक्षेत्र': या प्रभागांकडे सर्वांचे लक्ष
- पुणे महापालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपले 'हेवीवेट' उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये काही प्रमुख लढतीचा हा आढावा..
- प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभाग १ (सूस-बाणेर-पाषाण) येथे सत्तेचा थेट संघर्ष आहे. भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी) आणि लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर या दोन युवा नेत्यांमधील लढत सर्वाधिक चर्चेत आहे.
- प्रभाग २४ (कसबा पेठ) येथे पुन्हा एकदा 'हायव्होल्टेज' मुकाबला होणार आहे. भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेना (UBT) चे प्रणव धंगेकर यांच्यात काटाजोड लढत अपेक्षित आहे.
- प्रभाग ३८ (कात्रज-आंबेगाव) येथे बहुरंगी सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीचे प्रकाश कदम, ठाकरे सेनेचे वसंत मोरे, शिंदे सेनेचे स्वराज बाबर आणि भाजपचे व्यंकोजी खोपडे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
- प्रभाग २३ (नाना-रविवार पेठ) येथे दोन महिला नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. शिवसेनेच्या प्रतिभा धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर एकमेकांसमोर ठाकल्या आहेत.
चुरशीच्या इतर प्रमुख लढती
प्रभाग ८ (औंध-बोपोडी) येथे सनी निम्हण (भाजप) आणि प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी) यांच्यात जोरदार लढत आहे. स्थानिक प्रश्नांवरून तापलेले वातावरण आणि विरोधकांची तगडी फळी यामुळे निम्हण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि संघर्षाची ठरणार आहे.
- प्रभाग १८ (वानवडी): प्रशांत जगताप (काँग्रेस) वि. अभिजित शिवरकर (भाजप).
- प्रभाग ३६ (सहकारनगर): आबा बागूल (UBT) वि. महेश वाबळे (भाजप) आणि सुभाष जगताप वि. वीणा घोष.
- प्रभाग १४ (कोरेगाव पार्क): उमेश गायकवाड (भाजप), सुनील गायकवाड (राष्ट्रवादी) आणि बाबू वागस्कर (मनसे) यांच्यात त्रिकोणी संघर्ष.












Click it and Unblock the Notifications