क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मारक महिला सशक्तीकरणाच्या अभियानाला आणखी उर्जा देईल- पीएम मोदी
PM Narendra Modi : पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. धरती महान विभूतींची आहे. सावित्रीफुले स्मारक हे आमचे संकल्प आणि महिला सशक्तीकरणाच्या अभियानाला आणखी उर्जा देईल असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढले.
पंतप्रधांनाच्या हस्ते आॅनलाईन पद्धतीने जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण, तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजन, छ. संभाजीनगर मधील बिडकीन आद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण , क्रांतीज्योती सावित्राबाई भिडेवाडा स्मारकाचा शिलान्यास,सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, अनेक नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकार्पण आणि उद्घाटनासाठी पुण्यात यायचं होते पण जोरदार पावसामुळे कार्यक्रमा रद्द करावा लागला यात माझेही नुकसान झाले. कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. मी पुण्यात येऊ शकलो नाही. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं दर्शन करण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे. असे मोदी म्हणाले.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोचेही भूमिपूजन होत आहे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांची पायाभरणी झाली. आपण वेगाने पुढे जात आहोत. आज विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांनाही भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट एअर कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी एअरपोर्टला अपडेट करण्याचं काम केलं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा केल्या आहेत त्यामुळे देश विदेशातून विठ्ठलांच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल. विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी लोकं थेट सोलापूरला येतील. व्यापार व्यवसाय आणि पर्यटनालाही गती मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यापूर्वी मुलींना शिक्षणाची दारे बंद होती पण ही दारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उघडी केली. पण स्वांतत्र्यांनतरही मुलींना म्हणावी तशी शिक्षणाची संधी मिळाली नाही. शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये देखील नव्हती. त्यामुळे मुलींना शाळा सोडावी लागत असे. मागील सरकारांनी महिलांबाबत ठोस काम केले नाही. आमच्या सरकारने राबविलेल्या स्वछता मिशनचा फायदा देशातील मुली, आणि महिलांना झाला, त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली तसेच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हे पुढील पिढींसाठी प्रेरणा देणारे असेल, तर आमच्या संकल्पासाठी आणि महिला सशक्तीकरणाच्या अभियानाला उर्जा देणारे असेल असंही प्रतंप्रधांनानी या वेळी सांगितले.
गुंतवणूकीतून रोजगाचा मंत्र
पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिडकीन इंडस्ट्रीयल एरिया 8 हजार एकरमध्ये पसरला आहे. येथे मोठमोठ्या उद्योगांसाठी हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे त्यामुळे, हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीचा का मंत्र ध्यानात घेतला पाहिजे. आपल्याला भारत आधुनिक बनवयाचा आहे पण सोबत परंपराही जपायच्या आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे.












Click it and Unblock the Notifications