पितृ पंधरवड्यात दोन ग्रहणांचे सावट, जाणून घ्या कधी आहे पहिले श्राद्ध
Pitru Paksha 2024 :पितृ पक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध घातले जाते त्यामुळे हा पंधरवडा पितरांना समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृ पक्ष सुरू होतो. तर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला पितृ पक्ष समाप्त होतो.
संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या काळात पितरं पृथ्वीवर वास करतात. यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान वगैरे केली जातात, यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो. यंदा पितृ पक्षावर चंद्रग्रहणाचं सावट आहे. त्यामुळे पितृ पक्ष नेमके कधी सुरू होणार? जाणून घेऊया.

पितृ पक्ष 2024 कधीपासून सुरू होणार?
गणपती विसर्जनानंतर पितृ पक्षाला सुरुवात होते. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. या वर्षी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होईल.
18 सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध
यंदा 17 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरूवात होत आहे. मात्र, या दिवशी पौर्णिमा असल्याने पितरांना श्राद्ध अर्पण केलं जाणार नाही. 18 सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध घातलं जाईल.
दोन ग्रहणाचे सावट
यंदा पितृ पक्षाचे चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट राहील. यात 17 रोजी चंद्रग्रहण, तर 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही. असं असलं तरी, ज्योतिष शास्त्रानुसार, पितृपक्षावर ग्रहणांचा परिणाम होऊ शकतो. कारण 15 दिवसात दोन ग्रहणं शुभ मानली जात नाहीत.
पितृ पक्ष 2024 महत्वाच्या तारखा
दरवर्षी भाद्रपद मासात पितृ पंधरवडा सुरु होतो आणि तो 16 दिवस असतो. या कालावधीत पितरांच्या शांतिसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं जातं. या काळात श्राद्ध घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते, तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो आणि त्याच्या घरात सुख-समृद्धी नांदते. त्यासाठी पुर्वजांच्या मृत्यू तिथीनुसार श्राद्ध घातले जाते.
प्रष्टपदी/पौर्णिमा श्राद्ध: मंगळवार 17 सप्टेंबर
- 18 सप्टेंबर : प्रतिपदा श्राद्ध
- 19 सप्टेंबर द्वितीयेचे श्राद्ध
- 20 सप्टेंबर तृतीयेचे श्राद्ध
- 21 सप्टेंबर चतुर्थी श्राद्ध
- 22 सप्टेंबर पंचमी श्राद्ध
- 23 सप्टेंबर षष्ठीचे श्राद्ध आणि सप्तमीचे श्राद्ध
- 24 सप्टेंबर अष्टमी श्राद्ध
- 25 सप्टेंबर नवमी श्राद्ध
- 26 सप्टेंबर दशमी श्राद्ध
- 27 सप्टेंबर एकादशी श्राद्ध
- 28 सप्टेंबर द्वादशीचे श्राद्ध
- 29 सप्टेंबर माघाचे श्राद्ध
- 30 सप्टेंबर त्रयोदशीचे श्राद्ध
- 1 ऑक्टोबर चतुर्दशीचे श्राद्ध
- 2 ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्या












Click it and Unblock the Notifications