Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात थरारक हत्याकांड! मित्रांनी केली व्यावसायिकाची हत्या; मृतदेह रस्त्यावर फेकला, Video व्हायरल!

Pimpri Chinchwad murder News : पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी चारोळीतील अलंकारपुरम ९० फूट रोडवर घडलेल्या एका अत्यंत थरारक हत्याकांडाने खळबळ उडवून दिली आहे. व्यावसायिक असलेल्या एका व्यक्तीला त्याच्याच ओळखीतील मित्रांनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून गोळी झाडून ठार केले आणि नंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून कारसह पळ काढला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेजमधील क्रूरता पाहून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pimpri Chinchwad Murder

नेमकी घटना आणि थरारक सीसीटीव्ही फुटेज!

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्ती नितीन शंकर गिलबिले (वय ३८, रा. वडमुखवाडी, चहोली) हे जमीन-खरेदी-विक्री आणि हॉटेल व्यावसायिक होते. नितीन गिलबिले हे खडी मशीन रस्त्यावर थांबले असताना आरोपींनी त्यांना कारमध्ये बसवले. ते त्यांच्या हॉटेलच्या दिशेने जात असताना कारमध्ये वैयक्तिक कारणांवरून तिघांमध्ये वाद झाला.

गोळीबाराचा थरार

सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कारबाहेर काही वेळ चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले. त्याच क्षणी, आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे नितीन यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह फेकण्याचा क्रूर प्रकार

खून केल्यानंतर आरोपींनी नितीन यांचा मृतदेह कारमधून बाहेर रस्त्यावर फेकला. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाही, आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही, तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढून गेल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. मृतदेह रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत टाकून आरोपींनी कार वेगाने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने घेऊन पळ काढला.

पोलीस तपास आणि आरोपींचा शोध

या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस आणि क्राइम ब्रँचची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक तपासात आरोपींची नावे अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी समोर आली आहेत. नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेष पथके रवाना!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या संपर्कातील लोकांची कसून चौकशी करत आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

नितीन गिलबिले हे चारोळी-चहोली परिसरात ओळखले जाणारे व्यावसायिक होते. कारमध्ये बसवून खून करण्याची ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांसमोर ही एक मोठी आव्हानात्मक केस बनली असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी तसेच खूनाचे खरे कारण आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. पुढील काही तासांत तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+