पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा मृत्यू
Water Tank collapsed pimpari chinchwad : पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी सद्गुरू नगरमध्ये ही घटना आज सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असुन बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवडच्या सदगुरु नगरमधील पाण्याची टाकी कोसळली असून त्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप कारण समजू शकलं नाही.
या पाण्याच्या टाकीचे निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्याचं स्थानिक लोकांच म्हणणं आहे. स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications