Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फुलंब्रीत 'मविआ' विरुद्ध भाजप लढत! कोण होणार आमदार, मंगेश साबळे, बापू घडामोडे की जगन्नाथ काळे? वाचा

Phulumbri MVA Vs BJP contest : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे आता राज्यस्थानचे राज्यपाल झाले. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नवीन चेहरा उमेदवार म्हणून असणार आहे. दुसरीकडे बागडे यांचे पारंपरिक विरोधक तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे कॉंग्रेसकडूनसुद्धा नवा उमेदवार असणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. पण, यावेळी बागडे विरुद्ध काळे अशि पारंपरिक लक्षत नसणार आहे.

Phulumbri MVA Vs BJP contest

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. बागडे आता राज्यपाल झाल्याने या ठिकाणी भाजपकडून ते उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या ठिकाणी तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने ते प्रचारालाही लागले आहेत. पण, उमेदवारी मात्र एकालाच मिळणार आहे. भाजपकडून इच्छुकांमध्ये बाजार समितीचे चेअरमन राधाकिसन पठाडे, माजी महापौर बापू घडमोडे, फुलंब्री बाजार समितीच्या चेअरमन अनुराधा चव्हाण, बाजार समितीचे सदस्य रामबाबा शेळके, रामूकाका शेळके, विजय औताडे, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांची नावे चर्चेत आहेत.

काँग्रेसलाही द्यावा लागणार नवा उमेदवार

या ठिकाणी काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे उमेदवार असत. पण, काळे आता खासदार झाले. त्यामुळे कॉंग्रेसकडून या ठिकाणी नवा उमेदवार असेल हे निश्चित आहे. दरम्यान, महविकास आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार की ठाकरे गटाला हेही औत्सुक्याचे आहे. पण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनही मतदारसंघ ठाकरे गटाला तर फुलंब्री कॉंग्रेसला मिळेल अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने कॉंग्रेस आणि भाजपने तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसकडून जगन्नाथ काळे, विलास औताडे, संदीप बोरसे, मोहन देशमुख आदी इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे मुलाखतीही दिल्या आहेत.

Take a Poll

मंगेश साबळे लढणार का?

फुलंब्री तालुक्यातील गेवराईचे सरपंच मंगेश साबळे यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी अनपेक्षितरीत्या तब्बल 1 लाख 55 हजार 930 मतं घेतली. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार का, याकडे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता. या मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णायक असल्याने जरांगे काय भूमिका घेतात, हे बघणे औत्सुक्याचे आहे. मराठा समाजापाठोपाठ दलित, मुस्लिम मतदार आहेत.

शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला दावा

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे घेण्यासाठी फुलंब्रीच्या शिष्टमंडळाने थेट बारामती येथे जाऊन शरद पवारांना साकडे घातले. या मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा धागा पकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने बारामती गाठून शरद पवार यांची भेट घेत हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर इच्छुक आहेत‌.

Phulumbri MVA Vs BJP contest

गतवेळी काय झाले होते?

वर्ष 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा 15 हजार 274 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या रावसाहेब दादाराव दानवे यांचा 1 लाख 9 हजार 958 मतांनी पराभव करून विजय मिळवला. त्यामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

या आहेत समस्या

या मतदारसंघात शेंद्रा एमआयडीसीमुळे औद्योगिक विकास झाला. पण, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, शेतमालाला कमी भाव, पाणीटंचाई या समस्या आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+