Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोणत्या पक्षाला किती झालं मतदान, 2ऱ्या क्रमांकांची मतं तरीही काँग्रेसचे हाल, दादांचा स्ट्राईक रेट?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झालेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 236 विजय मिळाला. विरोधी बाकांवरील मविआला अवघ्या 49 जागांवर विजय मिळवता आला.

या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 288 पैकी 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागांवर विधानसभेत विजय मिळवता आला.

लोकसभेला 1 जागा अन् विधानसभेत 41 जागांवर विजय

लोकसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आलेल्या अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारत विधानसभेला 41 जागा निवडून आणल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवार गटाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळाला.

Maharashtra Assembly Election 2024

टक्केवारीत अजित पवार सर्वाधिक कमी

या निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवर आणि पॅटर्नवर नजर टाकल्यास अनेक रंजक गोष्टी समोर आलेल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षाला राज्यात सर्वाधिक कमी मतं मिळाली आहेत. तरी अजित पवार गटाने 41 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची कमाल करुन दाखवली आहे. तर अजितदादा गटापेक्षा तब्बल 22 लाख मतं जास्त मिळवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 16 जागांवरच विजय मिळवता आला.

पक्षनिहाय झालेल्या मतदानांची संख्या

भाजपला सर्वाधिक मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मते मिळाली आहेत. भाजपची मंत इतर पाच पक्षांनी स्वतंत्र घेतलेल्या मतदानापेक्षा दुपटीपेक्षाही जास्त आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसला 80 लाख 20 हजार 921 मतं मिळाली आहे. तर लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसला या विधानसभेत मात्र लोकांनी नाकारलं आहे. दुसऱ्या क्रमाकांचे मत मिळाली असली तरी त्यांना म्हणावा तसा विजय राज्यात घेता आला नाही.

तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट असून शिवसेनेला काँग्रेसपेक्षा थोडेच कमी म्हणजेच 79 लाख 96 हजार 930 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 56 आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपनंतर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष हा शिवसेना ठरला आहे.

चौथ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असून 72 लाख 87 हजार 797 मतं मिळवली आहेत. तर त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले आहेत. तर अनेक दिग्गज लोकांचा पराभव झालेला आहे. राष्ट्रवादीची पहिली फळी सोडून गेल्यानंतर शरद पवार काही जादू करतील असे वाटत होते. परंतु, तसे झाल्याचे दिसून आले.

पाचव्या क्रमांकावर ठाकरे यांची शिवसेना असून त्यांना 64 लाख 33 हजार 013 मतं मिळाली आहेत. त्यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्यांना हे अपयश न पचणारे आहे. कारण लोकसभेत देखील त्यांच्यात मोठी पाहायला मिळाली होती. जवळपास 9 खासदार निवडून आले होते.

अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर असून त्यांना 58 लाख 16 हजार 566 मते मिळाली आहेत. अजित दादांचे 41 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे महायुतीची एकूण आकडेवारी ही 236 च्या आसपास गेली आहे. विकासाचं राजकारण हा मुद्दा घेऊन गेल्याने अजित पवारांना हे यश मिळाले आहे. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त मत मिळाली आहेत. कारण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत खूप जास्त जागा लढवल्या होत्या.

अजित पवारांनी कमी जागा लढवल्या, पण विजयी होणाऱ्याच

अजित पवारांनी कमी मात्र निवडक व हमखास निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे शरद पवार गटापेक्षा 14 लाख 71 हजार 231 मतं कमी मिळवूनही त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले. कारण त्यांना विजयी होणारे उमेदवारच त्या ठिकाणी दिले.

शिंदेंनी ठाकरेंपेक्षा जास्त मत घेतली

शिंदेंच्या शिवसेनेने मात्र ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा फक्त जागांच्या बाबतीतच नाही, तर मतांच्या बाबतीतही मोठी आघाडी घेतली आहे. शिंदेंच्या सेनेने ठाकरेंच्या सेनेपेक्षा 15 लाख 63 हजार 917 जास्त मिळवली आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+