लाखांचे लीड घेऊन धनंजय मुंडे यांनी मारले परळीचे मैदान; राजेसाहेब देशमुख यांचा पराभव

Parli Assembly Result 2024 Dhananjay Munde's victory : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत मतदारसंघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. देशमुख यांचा त्यांनी लाखाच्या मतांनी पराभव केला आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे यांची जडणघडण झाली. नात्याने धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे लागतात.भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून धनंजय मुंडे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळीच धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली मैत्री घट्ट झाली. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु 2009 च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांचा पत्ता कापला. आणि धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आश्रय घेतला. तेव्हापासून परळीत मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष चांगलाच रंगला.

Maharashtra Assembly Election 2024

2014 साली गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे मंत्री झाल्या, तर धनंजय मुंडे यांच्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली.. उत्तम वक्तृत्व शैली आणि अभ्यासू वृत्ती यामुळे धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रचंड गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख निर्माण झाली.. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे गटासाठी हा मोठा धक्का होता. या पराभवामुळे भाजपमध्ये मोठे धमासान रंगले. पण अडीच दिवसाच्या सरकारच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे उघड झाले. अजित पवार यांच्या कथित बंडाचे नाट्यशामुले आणि अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महाविकास आघाडीत सहभागी झाले. त्या धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आणि ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. अजित पवार महायुती सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

धनंजय मुंडे अजित पवार यांना साथ देत असल्याचे पाहून शरद पवार संतप्त होते. छोट्या जातीतला तरुण नेता असा शब्दात शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची हेटाळणी केली होती. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी संघर्षाचा धनंजय मुंडे यांना फटका बसेल अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होती. पण आपल्या समोरील सर्व आव्हाने मोडून काढली धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+