Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

परळीत हाय व्होल्टेज सामना! धनंजय मुंडे की राजेसाहेब देशमुख? जरांगे फॅक्टरचा परिणाम होणार का?

Parli Assembly election 2024 dhanjay munde vs rajesaheb Deshmukh : परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणुकांपैकी एक आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आहेत. राजकारणातील हे दोन दिग्गज आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, आणि हा सामना चुरशीचा बनला आहे.

धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघातील दबदबा

धनंजय मुंडे हे परळीच्या राजकारणात एक प्रतिष्ठेचे नाव आहे. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रित आहेत‌. पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचा जोमाने प्रचार करीत आहेत. मुंडे कुटुंबाला मतदारसंघाची चांगली समज असून, त्यांचा परळीतील विकासकामांवर पकड आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे, आणि त्यांनी आतापर्यंत केलेली कामे त्यांच्या समर्थनात आहेत.

Parli Assembly election 2024 dhanjay munde vs rajesaheb Deshmukh

महाविकास आघाडीचे मराठा कार्ड

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने परळीत राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळले आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून परिचित आहेत, आणि परळीतील मतदारांसोबत त्यांचा पूर्वीपासूनच संपर्क आहे. त्यांच्या प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

'एमएमडी फॉर्म्युला'चा प्रभाव

या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा 'एमएमडी' फॉर्म्युला (मराठा, मुस्लिम, दलित) मुंडे यांच्या विरोधात प्रभाव टाकू शकतो. मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार, त्यांचे समर्थक कुणाला मतं देणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Take a Poll

पंकजा मुंडे यांची भूमिका

धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी बहीण पंकजा मुंडे याही मैदानात उतरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार न झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तो वचपा आता मुंडे कुटुंबीय काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांचा विजय व्हावा, यासाठी पंकजा मुंडे याही जोर लावत आहेत.

Parli Assembly election 2024 dhanjay munde vs rajesaheb Deshmukh

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे

या निवडणुकीत भयमुक्त परळी, उद्योग विकास, आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा हे महत्त्वाचे मुद्दे असतील. राजेसाहेब देशमुख हे या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत, तर मुंडे यांनीही परळीत विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

परिणामकारकता आणि भविष्याचा निर्णय

परळी विधानसभा मतदारसंघातील हा सामना म्हणजे एक प्रतिष्ठेची लढत आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हे अस्तित्वाचे युद्ध मानले जात असून, राजेसाहेब देशमुख यांचे मजबूत आव्हान आहे. जरांगे पाटील यांचा आशीर्वाद कुणाला मिळतो यावरही मतदारसंघातील निकाल ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+