Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऐतिहासिक कामगिरी, वेल डन! पीएम नरेंद्र मोदींकडून मनू भाकरंचं कौतूक, देशवासीयांकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली - पॅरिस ऑलम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी भारताची स्टार शुटर मनू भाकर हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे खास कौतूक केलं आहे.

यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनूचे कौतूक केले. क्रिडामंत्र्यांनीही तिचे अभिनंदन केलं असून सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

PM Narendra Modi  Ajit Pawar shower wishes on Paris Olympics medalist Manu Bhakar Maharashtra News

पंतप्रधानांची पोस्ट

"ऐतिहासिक पदक! छान केले, ParisOlympics2024 मध्ये भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्दल! कांस्यपदकासाठी अभिनंदन. हे यश आणखी खास आहे कारण ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. एक अविश्वसनीय यश! असे म्हणत पंतप्रधानांनी मनू भाकर हिला शुभेच्छा दिल्या आहेत."

अभिनंदन मनू - क्रीडामंत्री मांडवीय

मनू भाकर हिचे कौतूक करताना केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, "अभिनंदन मनू, तू तुझे कौशल्य आणि समर्पण प्रदर्शित केलेस, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी तू पहिली महिला नेमबाज झाली आहेस!"

ParisOlympic2024 मध्ये भारताचे पहिले पदक, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक!अभिनंदन मनू, तू तुझे कौशल्य आणि समर्पण प्रदर्शित केलेस, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी तू पहिली महिला नेमबाज झाली आहेस!

मनूचे अजित पवारांकडून अभिनंदन

अजित पवार म्हणाले, "फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने मनू भाकर हीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे. ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे, हे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य आहे.

मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन. भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी मनापासून शुभेच्छा...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+