बदलापुरात दोन चिमुरड्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार, हजारो संतप्त नागरिकांचा रेल्वे रोको आंदोलन
Badlapur school girl rape case : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून हजारों पालक आणि नागरिक शाळेबाहेर ठिय्या दिला आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आली.
बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून घटनेचे गांभीर्य न ओळखता दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते.

सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले. मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. यात हजारो बदलापूरकर सामिल झाले.
Maharashtra | Protest underway at Badlapur Station against the alleged sexual assault incident with a girl child at a school in Badlapur
— ANI (@ANI) August 20, 2024
(Source: PR Dept, Central Railway) https://t.co/tEdQmiAcIf pic.twitter.com/vJj6Jf7Hgo
काय आहे प्रकरण
बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींते शाळेच्या स्वच्छतागृहात अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास लावले. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतेही गांभीर्य न दाखवल्याने शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले.












Click it and Unblock the Notifications