मविआच्या काळात फडणवीस, एकनाथ शिंदेंना अटक करण्याचा प्रयत्न झाला, परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य काही नेत्याना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती.या बैठकीला शरद पवार,अनिल देशमुख उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला. मी अशाप्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नसल्याचं आपण त्यांना स्पष्टपणे सांगितलं, असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
Param Bir Singh alleges attempts to implicate Fadnavis, Shinde by MVA government; says Uddhav, Pawar exerted pressure on officials
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2024
Read @ANI Story | https://t.co/6h3gx3rZaK#ParambirSingh #UdhhavThackeray #SharadPawar #AnilDeshmukh pic.twitter.com/idTHTEP3aE
शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला अनिल देशमुख उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुंबई बॅंक प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, याप्रकरणाची चौकशी झाली असून ही केस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मी पुन्हा कारवाई करता येणार नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्याविरोधातही खोट्या केस दाखल करून मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. ठाण्यातील एका जुन्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी केली होती. त्यांना संजय पांडे यांच्याकडून निर्देश मिळत होते. तर संजय पांडे यांना अनिल देशमुख, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्देश दिले जात होते,असं परमवीस सिंह यांनी म्हटलं आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे याच प्रकरणात तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना अटक करण्यासाठी संजय पांडे यांनी सरदार पाटील यांना निर्देश दिले होते,असा दावाही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications