पवित्र प्राजक्ताची फुले सांडताना पाहिली... पंकजा मुंडे यांचा काव्यात्मक भाषेत सुरेश धसांना टोला
सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर आ. सुरेश धस यांचे आरोप महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले. दोन दिवसांपूर्वी आ. धस यांनी थेट अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख करत नव्या परळी पॅटर्नचा पोलखोल केला होता. त्यानंतर प्राजक्ता माळी यांनीही सुरेश धसांना चांगलेच कोंडीत पकडले होते. आता याच धस-माळी वादावर पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेता विषय ठरत आहे.

काय होता वाद
आ. सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह रश्मिका मंधाना यासारख्या अभिनेत्रींचे नाव घेत, परळी पॅटर्नच्या इव्हेंट मॅनेजमेंट पाँलिटिक्सचा उल्लेख केला होता. प्राजक्ता माळी यांचा परळी हा नवीन पत्ता आहे, असेही ते म्हणाले होते. आ. धस यांच्या या आरोपानंतर काल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही जोरदार उत्तर दिले. घाणेरड्या राजकारणासाठी फक्त महिलांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पंकजा मुंडे यांनी केले समर्थन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन प्राजक्ता माळी यांच्या कालच्या पत्रकार परिषदेचे समर्थन केले. तसेच, आमदार सुरेश धस यांना जोरदार टोला लगावला आहे. पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचं कुठेही नाव घेतलं नाही. पण काल पाहवलं नाही... असे म्हणत कालच्या प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केलंय. तसेच, सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वत:ला कणखर बनवायला हवं, असे म्हणत साहित्यिक भाषेतून संदेश दिला आहे.
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 29, 2024
काय आहे ट्विट
''शक्ती शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व,'' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवणे किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केले जात असल्याचे आपल्या ट्विटमधून सूचवलं आहे. तसेच, कालच्या घटनेचा संदर्भ बोलताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ साहित्यिक शब्दात पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले, असे म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications