पंकजा मुंडेंच्या गळ्यात विजयी माळ विधानपरिषदेत बाजी, बनल्या आमदार
मु्ंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ पराभव झाल्यानंतर आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आहे. या विजयाबरोबरच त्यांचा राजकीय वनवास संपला

विजयामुळे पंकजांचे राजकीय पुनर्वसन
भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने भाजपने त्यांना विधानपरिषदेत संधी दिली होती. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला. या विजयाबरोबरच पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असून त्या आमदार झाल्या आहेत.
लोकसभेला पराभव
मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातून बाजूला झाल्या होत्या.त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी दिली गेली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी त्यांचा सुमारे सहा हजार मतांनी पराभव केला होता.
हा पराभव चाहत्यांच्या आणि समर्थकांच्या जिव्हारी लागला होता. पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे तरुणांनी आत्महत्याही केल्या होत्या. पण आज पंकजा मुंडे आमदार झाल्या आहेत. त्यामुळे समर्थक आणि चाहते समाधानी झाले आहे.












Click it and Unblock the Notifications